हे करून पहा लहान मुलांकडून बरेच काही शिकण्यासारखे असते.
त्यांचा मेंदू विकसित होत असतो, त्यावर कुठलीही बंधने नसतात.
म्हणून त्यांना जे पाहिजे असते ते त्यांच्यामार्फत मिळविले जाते.
पण आपण जसजसे मोठे होत जातो तसे पालकांकडून, मित्र-मैत्रिणींकडून, शाळेतून वा इतरत्र आपल्याला ऐकावयास मिळते -
अरे हे करू नको, ते चांगले नाहीय, कुणाला विचारले का ?, तुला जमणार नाही, जाऊदे कशाला उगीच ...
आणि हमखास आपण त्याचे बळी ठरतो. पुढील वेळेस हे सर्व प्रश्न आपण स्वतःला विचरून जमले तर उडी टाकतो.
यात आपले स्वतःचे अस्तित्व स्वतःची ओळख हळूहळू पुसट बनत जाते. आणि सरतेशेवटी उरतो तो फक्त आजूबाजूच्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा हाडा मांसाचा गोळा.
आता हे बदला.
लहान मुलांसारखे प्रश्न विचारा, पाहिजे ते मिळेपर्यंत मागा, यशासाठी हट्ट करा.
कुणीतरी म्हटलंय -
Ask,and it shall be given you,
Seek, and ye shall find,
Knock, and it shall be opened unto you...
हीच वेळ आहे स्व शोधण्याची.
आपल्या Instinct शोधून मार्गस्थ व्हा.
हे केले तर कोणी काही म्हणेल का? त्यांना काय वाटेल ? मला नाही जमले तर ?
आता हे प्रश्न विचारण्याची वेळ गेलीय. आता फक्त जिंकायचय माल हे मनाशी ठरवून कामाला लागा.
तुमच्या स्वप्नांची शेपटी पकडून त्यांना सत्यात ओढून आणा.
जिंकून दाखवा.
- पराग -