एरवी मोठ्या अभिमानाने 'मी नगरकर' बिरुद मिरवणारे आम्ही आज निरुत्तरित झालोय. प्रेमाचे संदेश देणारे आमचे संत, देवादि-मंडळी सुद्धा असेच अंतर्मुख झाले असावेत (स्वर्गातून). एका निरपराध मुलाचा वध करणारे नराधम जोपर्यंत दंडास प्राप्त होत नाही तोपर्यंत मला नगरकर म्हनाविण्याची लाज वाटेल. प्रेम करणे हा गुन्हा आहे असे समज बाळगणारे भूमीत जन्माला येउच नये. कारण हि भूमी आहे कृष्णाची, कबीराची आणि देश प्रेमाला अर्पण झालेल्या शहिदांची. 'प्रेम', मग ते कोणासाठीही असो, या भूमीचे वैशिष्ट्य होते आणि असावे असा भारत निर्माण करायचाय. जाती-पातीत विघटीत झालेले भावनाविश्व पुनर्जीवित होणे गरजेचे आहे. देव त्या कोवळ्या मनाला शांती देवो.