विज्ञान प्रसार हाच ध्यास घेऊन आजपर्यंत अनेक उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केलेत.
अशीच एक जुनी आठवण सर्वांसोबत share करावी असे वाटले.
तीन वर्षांपूर्वी आम्ही जिल्हा परिषदांतर्गत येणाऱ्या शाळेतील शिक्षकांसाठी
" टाकाऊ वस्तूंपासून विज्ञान उपकरणे "
ही कार्यशाळा आयोजित केली होती.
या उपक्रमात १३ जिल्यातील सुमारे ४०० शिक्षक सहभागी झाले होते.
अतिशय सोप्या आणि सहज उपलब्ध वस्तू , तसेच घरातील टाकाऊ घटक वापरून ,
एक छोटीशी वैज्ञानिक प्रयोगशाळाच त्या शिक्षकांनी सोबत बनवून नेली.
विद्यार्थ्यांना सुद्धा अशीच लहान, अगदी त्यांच्या दप्तरात बसेल अशी ही विज्ञान प्रयोगशाला सर्वांच्या प्रयत्नाने तयार झाली. या कामी श्री. अरविंद
गुप्ता सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
अणि अर्थातच आमच्या सर्व सहकार्यांचे परिश्रम
तर अमूल्य होते. शेवटी अशी कामे ही एकत्रितपणे करण्याची मजाच वेगळी असते.