Sunday, September 11, 2011

तारांगण...

अनंत विश्वाबद्दल मानवाला वाटणारे  आकर्षण हे सर्वज्ञात आहेच.
असंख्य तारे, आकाशगंगा, ग्रहिकांच्या पसाऱ्यात असणारे आपले अस्तित्व नगण्य असले तरी ते निष्फळ अजिबात नाही.
त्यामुळेच जीवन असणारी पृथ्वी  हे एक दुर्मिळ ठिकाण आहे.
पृथ्वीचे स्वतःचे अस्तित्व हे एक विशेष असून त्यावरील मानव हा त्या मालिकेतील प्रमुख निर्मिती आहे.
स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर त्याने शक्य होईल तेवढे ब्रम्हांड जाणण्याचा प्रयत्न सदैव केलेला आहे आणि तो सुरूच राहणार आहे.
पण तरी मनात खंत असायची की,




सध्या ज्ञात असलेल्या विश्वाची आपल्या देश बांधवांना कितपत माहिती आहे ?
याच प्रश्नाचे उत्तर शोधताना खगोलशास्त्राच्या प्रसाराचा मार्ग दिसला. २००३ पासून आजतागायत अनेक स्लाईड शो'स, आकाशदर्शन, उल्कावर्षाव पाहण्याचे कार्यक्रम , विद्यार्थ्यांचे खगोलवर्ग यातून खागोलाच्या माहिती प्रसाराची मोहीम सुरु झाली, जी आजही कार्यरत आहे.

No comments:

Post a Comment