कधीतरी अचानक आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून जातो.
जगण्यासाठी नवीन आयाम खुला होतो आणि ,
आपले दुःख, निराशा हे क्षणभंगुर असतात कारण आपले आयुष्य तरी कुठे निरंतर चालते - हे लक्षात येते...
मग सुरु होतो दिव्यत्वाचा प्रवास,
स्वतःचा शोध घेण्यासाठी...
विश्वात पृथ्वीचे अस्तित्व नगण्य असेलही, पण आपले तर संपूर्ण आयुष्य कमी पडते या धरणीला जाणण्यासाठी.
तर मग सुरुवात करा आपापल्या आनंदयात्रेला..
न जाणो एखादं सुंदर फूल कधी मलूल होऊन पडेल ?
अंधारातून बाहेर डोकावणारा कवडसा कधी विरून जाईल ?
स्वप्न तुमच्याकडे येण्याची वाट पाहू नका तुम्हीच चालत जा आणि मिठी मारा तुमच्या इच्छांना..
आयुष्य हा प्रवास आहे..पण प्रवास हा ही आयुष्य होऊ शकतो !
- फिरा -
स्वच्छंदीपणे
रोज काहीतरी नवीन अनुभूती होऊ द्या.
करिअर हे २१ व्या शतकातले संशोधन असेलही पण मग हजारो वर्षांच्या उत्क्रांतीमधील
" भटकंती " चा वसा सोडून देऊ नका..
जंगलातील हिरवी शांतता असो वा
पायाखालील वाळू सरकताना'ची समुद्रावरील रम्य सायंकाळ..
मी तर भटकण्याचाच सल्ला देईल... निसर्ग झिरपू द्या नसानसात...
जिवंतपणा शोधा.
" प्रवासी व्हा अनंताचे "
रोज काहीतरी नवीन अनुभूती होऊ द्या.
करिअर हे २१ व्या शतकातले संशोधन असेलही पण मग हजारो वर्षांच्या उत्क्रांतीमधील
" भटकंती " चा वसा सोडून देऊ नका..
जंगलातील हिरवी शांतता असो वा
पायाखालील वाळू सरकताना'ची समुद्रावरील रम्य सायंकाळ..
मी तर भटकण्याचाच सल्ला देईल... निसर्ग झिरपू द्या नसानसात...
जिवंतपणा शोधा.
" प्रवासी व्हा अनंताचे "
- पराग -

No comments:
Post a Comment